बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (09:16 IST)

कोरोनाचे नियम न पाळणार्यांवर करिना संतापली

सध्याच्या देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे नागरिकांकडून आणि विशेषतः सेलिब्रिटीजकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन हेच आहे. त्यामुळे पब्लिकने कोरोनाचे नियम पाळलेच पाहिजेत, असे मत करिना कपूरने व्यक्त केले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लोकांनी ओळखलेच पाहिजे हे सांगण्यासाठी करिनाने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट टाकली आहे. लोक अजूनही बिनदिक्कतपणे बाहेर कसे हिंडू शकतात, हे आपल्याला समजतच नाही. घराबाहेर हिंडता, मास्क हनुवटीखाली खेचता आणि नियम मोडता, हे असे कसे केले जाऊ शकते. हे वाचत असलेला प्रत्येक जण कोरोनाची साथ पसरवण्यासाठी जबाबदार आहे, असे करिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापेक्षाही संपूर्ण भारताला तुमची गरज आहे, याची आठवणही बेबोने करून दिली आहे.
 
आमिर खानबरोबरच लालसिंग चढ्ढामध्ये करिना दिसणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या साथीमुळेच त्याचा रिलीज पुढे ढकलला गेला आहे.