1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (11:38 IST)

कैटरीना कैफ गरोदर

बॉलिवूड अभिनेत्री कैटरीना कैफच्या प्रेग्नेंसीला घेऊन परत एकदा चर्चा सुरु झाली आहे. चला जाणून घेऊ या खरच कैटरीना कैफ प्रेगनेंट आहे का?

बॉलीवुड स्टार कपल कैटरीना कैफ आणि विक्की कौशल या जोडीला चाहत्यांचे नेहमीच प्रेम मिळत आले आहे. चाहते स्टार बद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मागील काही काळापासून कैटरीना कैफच्या प्रेगनंसीबद्दल खूप चर्चा सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, कैटरीना कैफ गरोदर आहे आणि ती लंडनमध्ये आहे. या दरम्यान सोशल मीडियावर या कपल्सचा लंडनमधील व्हिडीओ वायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओमुळे अभिनेत्रीच्या गरोदरपणाच्या चर्चा अजून वाढल्या आहेत. पण खर्च कैटरीना कैफ गरोदर आहे का? 
 
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला असून त्यामध्ये दिसले की, कैटरीना कैफ आणि विकी कौशल हे रस्त्याच्या किनाऱ्यावरून एकमेकांचा हात धरत जात होते. विक्की व्हिडीओ मध्ये कॅज्युअल आऊटफिट मध्ये दिसत आहे तर कैटरीना कैटरीना ओवर साइज ब्लॅक कोट घातलेली दिसत आहे. काही लोकांची दृष्टी तिच्या बेबीबंपर वर पडली. तर काही चाहते म्हणाले की, बेबीबंपरला हाईड करण्यासाठी तिने ओवर साइज कोट घातला असावा. 
 
तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कैटरीना कैफ खरंच गरोदर आहे आणि ती आपले बाळंतपण लंडनमध्ये करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कैटरीना कैफ खर्च गरोदर आहे आणि ती आता लंडनमध्ये आहे. म्हणून विक्की तिची विशेष काळजी घेतांना दिसत आहे. पण आजून विक्की आणि कैटरीना कैफ ने या चर्चेवर जबाब दिला नाही. 

Edited By- Dhanashri Naik