शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 12 डिसेंबर 2021 (15:46 IST)

Katrina Vicky Mehndi Photos: कतरिना -विक्की मेहंदी समारंभाचे फोटो व्हायरल

फोटो साभार- सोशल मीडिया (इंस्टाग्राम )
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात सात फेरे घेतले. कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नात उच्च सुरक्षा ठेवली होती, त्यामुळे या जोडप्याच्या फंक्शनचे कोणतेही फोटो समोर येऊ शकले नाहीत. पण आता लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर करून चाहत्यांना खूश करत आहेत. अलीकडेच कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मेहंदी समारंभातील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप धमाल करताना दिसत आहेत.
वास्तविक, कतरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचा वर विकी कौशल आणि सासरे श्याम कौशलसोबत नाचताना दिसत आहे. एका फोटोमध्ये कतरिना तिच्या भावंडांसोबत डान्स करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.
विकी कौशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो कतरिना कैफसोबत मस्ती करताना दिसत आहे. पहिल्या चित्रात विकी कौशल आणि कतरिना कैफ एकत्र नाचत आहेत. तर दुसऱ्या फोटोत विकी त्याची वधू कतरिनासाठी गुडघ्यावर बसला आहे. यावेळी त्यांनी हातात फुलेही घेतली आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफने या फोटोंसोबत असेच कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिले, 'मेहंदी दा सजदी जे नाचे सारा ताबा.' सोशल मीडियावर दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहे. प्रियांका चोप्रा, श्वेता बच्चन, झोया अख्तर यांच्यासह अनेक स्टार्सनी या फोटोंवर कमेंट करत या जोडप्याचे कौतुक केले आहे.