Daily Horoscope
✕

प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे

Updated: शनिवार, 25 जानेवारी 2025 (12:15 IST)
ALSO READ: अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभात संन्यास घेतला, आता हे असणार नवीन नाव<> मिळालेल्या माहितीनुसार मिस्टर इंडियामधील 'हवा हवाई' हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील एक पाऊल होते ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर दक्षिणेतही अनेक गाणी गायली आहे. याशिवाय, त्यांनी 45 वेगवेगळ्या भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. कविता कृष्णमूर्ती आज त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 25जानेवारी 1958रोजी दिल्लीतील अय्यर कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात घरापासून केली. तसेच वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत पहिले गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यांनी हे गाणे बंगालीमध्ये गायले.यानंतर कविताने अनेक गाणी गायली आणि 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार झुकता नहीं' या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये गायिका म्हणून ओळख मिळाली. कविताने तिच्या कारकिर्दीत आरडी बर्मनपासून अमित कुमार, उदित नारायण, कुमार सानू आणि इतर अनेक गायकांसह अनेक गाणी गायली. याशिवाय त्याने सोनू निगम आणि बाबुल सुप्रियो यांच्यासोबतही काम केले. 1995 ते 1997 पर्यंत कविताने सलग 4 वेळा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. 2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी व्यतिरिक्त, कविता कृष्णमूर्ती यांनी कन्नड, राजस्थानी, भोजपुरी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कोकणी, नेपाळी, आसामी आणि इंग्रजी अशा 45 भाषांमध्ये गाणी गायली आहे.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने एक धमकीचा ऑडिओ संदेश

ट्रेनमध्ये गाणारा 'हनुमान अंश' मधील नेत्रहीन गायक आता जग पाहू शकणार! उपचार सुरू

सलमान खानचे 'मातृभूमी'मधील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे नवीन गाणे प्रदर्शित

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

पुढील लेख
Show comments