मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (09:52 IST)

KRK ला मुंबई विमानतळावरुन अटक, 2020 मध्ये या ट्विटमुळे पोलिसांनी अटक केली

Kamal Rashid Khan was arrested by Mumbai's Malad Police for a controversial tweet in 2020 Bollywood Gossips Marathi In Bollywood Marathi
कमाल रशीद खानला 2020 मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना आजच बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. सेल्फ क्लेम समालोचक कमाल रशीद खान (KRK) याला पोलिसांनी अटक केली आहे. कमाल रशीद खान विरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटसाठी पोलिसांनी कमाल रशीद खानवर कारवाई केली आहे.मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
 
केआरके दररोज कोणत्या ना कोणत्या चित्रपटाबद्दल किंवा सेलिब्रिटीबद्दल चुकीची माहिती देतात, त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल देखील केले जाते.