मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (11:40 IST)

वयाच्या ८ व्या वर्षी वडिलांनी केले लैंगिक शोषण, खुशबू सुंदरचा मोठा खुलासा

लैंगिक शोषण किंवा छळ यात शरीराला आणि मानसिक त्रास कितपत सहन करावा लागतो याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे. आणि त्यातून तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून शोषण झाले असेल तर वेदना आणखीनच वाढतात. अलीकडेच भाजपा नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदरने धक्कादायक खुलासा केला आहे की, लहानपणी तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केले होते.
 
अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास केलेली खुशबू सुंदर अनेकदा चर्चेत असते. खुशबू नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य झाली होती. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की, जेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. ही गोष्ट ऐकून सगळेच अवाक् झाले आहेत. खुशबू म्हणाली की, जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो तेव्हा ते मुलं आयुष्यभर भीत असतं, हे मुली किंवा मुलाबद्दल नाही.
 
वडिलांनी जखमा केल्या
खुशबू सुंदर पुढे सांगतात की, जो माणूस फक्त आपल्या बायकोला आणि मुलांना मारणे आणि त्याच्या एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे समजतो. त्या पुढे म्हणाल्या की “मी फक्त आठ वर्षांची असताना माझ्यावर अत्याचार झाला, मी 15 वर्षांची असताना माझ्या वडिलांविरुद्ध बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. माझ्या आईनेही ते वातावरण पाहिले आहे जिथे काहीही झाले तरी ‘माझा नवरा माझा देव’ अशी विचारसरणी होती. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी मी विरोध करण्याबद्दल ठरवले होते.
 
तिच्या बालपणीच्या वाईट दिवसांची आठवण करून देताना खुशबू सुंदर पुढे म्हणाल्या की मी 16 वर्षांची असताना माझे वडील मला सोडून गेले. मग जेवण कुठून येईल हेही माहीत नव्हते. पण सर्व संकटांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. खुशबू सुंदर यांनी द बर्निंग ट्रेनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 2010 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.