रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

कधी काळी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाणारी अरबाज आणि मलाइका यांच्या वाद एवढे वाढले की मलाइका ने खान सरनेम लावणेही सोडले. मलाइका तर दिवाळीनंतर घटस्फोटासाठी अर्जी लावणार होती परंतू तिला असे करण्यापासून रोखले गेले.
 
तसं तर मलाइका कोणाच ऐकत नाही. तिला जसे वागायचे असेल ती तशीच वागते तरी या वेळेस कुटुंबाच्या दबावामुळे तिला आपला निर्णय टाळावा लागला. खान आणि अरोरा या दोन्ही कुटुंबाचे म्हणणे आहे की घटस्फोटासाठी घाई करणे योग्य नाही. विचार-विमर्श करून पाऊल उचलले पाहिजे.
सगळ्यांचे म्हणणे आहे की दोघांही जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करायला हवी. दोघांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. खान कुटुंब तर घटस्फोटाच्या अगदीच विरोधात आहे. कारण तिथे फक्त प्रेमाचे किस्से बघायला मिळतात.
 
सध्या तरी अरबाज आणि मलाइका वेगळे राहत आहे. परंतू करवा चौथच्या दिवशी दोघांनी एकमेकासोबत डिनर केल्याची बातमी आहे. बहुतेक दोघांना पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबातील लोकांनी हे जुळवून आणले असावे.