रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (21:26 IST)

मलायकाच्या व्हिडिओला आठ लाख व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी मलायका चाहत्यांना पाणी कसे प्यायचे? हे शिकवत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने पाणी पिण्याची योग्य पद्धत आपल्या चाहत्यांना शिकवली आहे. पाणी नेहमी  खाली शांत बसून प्यावे. कितीही घाई असली तरी उभे राहून पाणी पिणे टाळा. वैज्ञानिक संशोधनामध्ये सिद्ध झाले की उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक आहे.

त्यामुळे निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पण खाली शांत बसून. असा उपदेश आपल्या चाहत्यांना मलायकाने या व्हिडिओमधून केला आहे. मलायका अरोराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही तासांत सात लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तसेच शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.