1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (13:23 IST)

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोराचा जोरदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

Arjun Kapoor Birthday Party
Malaika Arora Dance : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 26 जून रोजी 38 वर्षांचा झाला आहे. या खास निमित्ताने काल रात्री अर्जुनने त्याच्या घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. अर्जुनची प्रेयसी मलायका अरोरासोबत अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली आणि खूप मजा केली.
 
मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला पांढरा आणि केशरी प्रिंटेड बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस घालून पोहोचली होती. अर्जुनच्या पार्टीत मलायकानेही जबरदस्त डान्स केला. मलायका अरोराचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या 'छैय्या छैय्या' या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मलायकाच्या किलर डान्स मूव्ह्ज पाहून चाहते वेडे झाले आहेत. चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. 
 
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन साजरे करताना दिसले आहेत. 
 
 
Edited by - Priya Dixit