शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (12:04 IST)

रतन टाटा यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिली श्रद्धांजली

Famous industrialist Ratan Tata passes away
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे वयाच्या 86 व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांनी बुधवारी मुंबई मधील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तसेच बॉलिवूड मध्ये देखील शोक व्यक्त केला जात आहे. 
 
बॉलिवूड सेलिब्रेटी दुःख व्यक्त करीत आहे. तसेच रतन टाटा यांना भारतचे असली हिरो मानत आहे. बॉलिवूड पासून तर टीव्ही शो सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. 
 
अभिनेते बोमन ईरानी यांनी लिहले की, उद्योगापासून परोपकार, मानवता आणि प्राण्यांप्रती त्यांचे प्रेम अमाप होते. त्यांनी देशामध्ये मोठे योगदान दिले आहे. ते कायम भारताचे सर्वश्रेष्ठ व्यक्ती राहतील. ते नेहमी आमच्या आठवणीत राहतील. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.
 
अभिनेते अजय देवगण यांनी लिहले की, विजिनरीच्या 
निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांची  लीगेसी जनरेशंसला नेहमी इंस्पायर करेल. भारतातील त्यांचे योगदान कल्पनेपेक्षा मोठे आहे. सरांच्या आत्म्याला शांती मिळू दे.
 
अभिनेते कमल हसन यांनी लिहले आहे की, रतन टाटा हे माझ्यासाठी हिरो होते. मी पूर्ण जीवन त्यांची नकल  करण्याचा प्रयत्न केला. त्यांची खरी संपत्ती त्यांनी कमावलेले पैसे नाही आहे तर त्यांची नैतिकता, प्रामाणिकपणा, विनम्रता, देशभक्ती आहे. 
 
अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी लिहले की, आपल्या दयाळूपणामुळे लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. आपले नेतृत्व आणि उदारता अनेक पिढींना प्रेरित करत राहील. तुम्ही आपल्या देशासाठी जे काही केले ते खूप मोठे आहे. तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहात.