1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (14:23 IST)

MasterChef India 7 Winner: आसामचे नयनज्योती सैकिया बनले 'मास्टरशेफ'

social media
सोनी टीव्हीचा लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो 'मास्टरशेफ इंडिया 7' चा विजेता ठरला आहे. 13 आठवडे प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या शोचा काल रात्री ग्रँड फिनाले झाला. फिनाले एपिसोडमध्ये शेफ रणवीर बरार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा यांच्यासह अनुभवी शेफ संजीव कपूर होते ज्यांनी 'सिग्नेचर थ्री-कोर्स मील चॅलेंज' मधील 3 अंतिम स्पर्धकांना जज केले होते.
 
आसामच्या नयनज्योती सैकिया याने विजेतेपद पटकावले आहे. चमकणाऱ्या ट्रॉफीसोबतच नयनज्योतीला 25 लाखांचे बक्षीसही मिळाले आहे, त्यामुळे विजेते खूप आनंदी आहेत. नयनज्योतीचा होम कुक ते मास्टरशेफ हा प्रवास प्रेरणादायी आहे. या शर्यतीत महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल आणि आसामच्या सांता सरमा यांना मागे टाकत नयनज्योती सैकिया विजेते ठरले आहे. त्यामुळे विजेते खूप खूश आहेत. नयनज्योतीचा होम कुक ते मास्टरशेफ हा प्रवास प्रेरणादायी आहे.
 
आसामच्या सांता सरमाह प्रथम उपविजेते आणि मुंबईच्या सुवर्णा बागुल ला  द्वितीय उपविजेते घोषित करण्यात आले आणि दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मास्टरशेफ बनलेले नयनज्योती सैकिया या विजयाने खूप खूश आहे. याविषयी तो म्हणाला, 'माझं एक साधं स्वप्न होतं आणि ते म्हणजे मास्टरशेफ इंडियामध्ये जाऊन स्वयंपाक करायचं, पण आता मला वाटतं की आयुष्यातील माझी सर्व ध्येयं पूर्ण झाली आहेत. मी मास्टरशेफ तर झालोच नाही तर मला ऍप्रनही मिळाला. ही पाककला स्पर्धा जिंकणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. नयनज्योतीच्या या विजयाने त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला आहे. तसेच त्यांचे फॅन्स त्यांना शुभेच्छा देत आहेत. 
 
Edited By - Priya Dixit