शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अजयच्या सिनेमात नानाची भूमिका

अॅक्शन, कॉमेडी अभिनेता अजय देवगण आपल्या प्रोडक्शन हाऊसला वाढवण्याचा प्रयत्न करत असून आता तो हिंदी आणि क्षेत्रीय सिनेमा तयार करणार आहे.
 
अलीकडेच अयजने वॉटरगेट प्रोडक्शन हाऊससोबत करार केला असून हे दोन्ही बॅनर मिळून अर्थपूर्ण सिनेमे तयार करणार आहेत. अजयच्या बॅनरखाली एक मराठी चित्रपट तयार होता आहे, परंतू अद्यापि त्याचे नाव निश्चित केलेले नाही. या चित्रपटात मराठीतील नटसम्राट नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करत असून चित्रपटाविषयी विशेष सांगायचे, तर अजय यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारेल. अजय कोणत्या भूमिकेत असेल आणि त्याची एण्ट्री कधी होईल, हे अद्यापि गुलदस्यात आहे.
 
हा चित्रपट कुटुंबप्रधान असून यात सुमती राघवन आणि इरावती हर्षेसुद्धा प्रमुख भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचा मुर्हूत अभिनेत्री काजोल देवगणच्या हस्ते करण्यात आला.