शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नवाजुद्दीनने 'हरामखोर’ साठी केवळ एक रुपया मानधन घेतले

नवाजुद्दीन सिद्दिकीने 'हरामखोर’ साठी केवळ एक रुपया मानधन घेतले
'हरामखोर’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी याने मानधनात केवळ एक रुपया घेतल्याचे समजते. याविषयी चित्रपटाच्या सह निर्माती असलेल्या गुनीत मोंगा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, नवाजुद्दीन आणि चित्रपटातील बाकी सदस्यांनी कमीत कमी तसेच काहींनी तर मानधन न घेताच काम केले आहे.

नवाजुद्दीनला चित्रपटाची कथा खूप आवडली होती. चित्रपटाच्या बजेटमध्ये अडथळे येऊनही त्याने यात काम करण्याचा निर्णय घेतला. तो एक चांगला व्यक्ती असून त्याने चित्रपटाकरिता केवळ एक रुपया मानधन घेतले. गुनीत मोंगा आणि अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाची संयुक्त निर्मिती आहे.