1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (17:25 IST)

'ए थर्सडे'मध्ये नेहा धूपिया दिसणार गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत!

Neha Dhupia will appear in 'A Thursday' in the role of a pregnant police officer!
रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबतच्या आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, 'ए थर्सडे'मधील एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात नेहा धूपियाच्या  बहुप्रतीक्षित लुकचे अनावरण केले. बेहजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 'ए थर्सडे' गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.
 
नेहा धूपियाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लुक शेअर केला आहे.
 
प्रतिभाशाली अभिनेत्री नेहा धुपिया एसीपी कैथरीन अल्वारेज नामक गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल.  
 
चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी 16 मुलांना बंधक बनवते. या थ्रीलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
 
'ए थर्सडे'ची निर्मिती आरएसवीपी मूवीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात येत आहे.