1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Oscar-nominated actress Barbara Barrie passes away

ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेत्रीचे दुःखद निधन; १२ वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या

हॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या बार्बरा बॅरी यांचे निधन झाले आहे.  २८ ऑक्टोबर रोजी मॅनहॅटनमधील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी, जेन हार्निक यांनी ही दुःखद बातमी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना असाध्य कर्करोग झाला होता आणि २०१४ पासून त्या 'इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस' या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 
बार्बरा बॅरी यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रतिनिधींचे भावूक निवेदन
ज्येष्ठ अभिनेत्रीच्या प्रतिनिधींनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे, "हार्निक कुटुंबाच्या वतीने, मी हे पुष्टी करू इच्छितो की, त्यांचे निधन वैद्यकीय मदतीने झाले आहे. हे न्यूयॉर्क राज्याच्या 'मेडिकल एड इन डायिंग' (मृत्यूसमयी वैद्यकीय मदत) कायद्यानुसार झाले असून, बार्बरा स्वतः या कायद्याचे समर्थन करत होत्या आणि त्यासाठी त्यांनी वकिलीही केली होती."
 
'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, असाध्य कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, बार्बरा यांनी आपल्या घरीच 'एंड-ऑफ-लाईफ केअर' घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निधनानंतर अनेक लोक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. 
 
या चित्रपट आणि मालिकांमुळे बार्बरा प्रसिद्धी झोतात आल्या
२३ मे १९३१ रोजी शिकागोमध्ये जन्मलेल्या बार्बरा यांनी न्यूयॉर्कमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी 'द वुडन डिश', 'द क्रुसिबल' आणि 'सिग्निफिकंट अदर' सारख्या कलाकृतींमध्ये काम केले. 
 
१९७९ मधील 'ब्रेकिंग अवे' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर नामांकन मिळाले होते. याव्यतिरिक्त, १९७० मधील 'कंपनी' या संगीतमय नाटकासाठी (म्युझिकल) त्यांना 'टोनी अवॉर्ड' मिळाले होते, तसेच आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेकदा 'एमी' पुरस्कारांसाठीही नामांकन मिळाले होते.
 
 त्यांनी 'द फ्युजिटिव्ह', 'फॅमिली टाइज' आणि 'नर्स जॅकी' सारख्या मालिकांमध्येही काम केले होते.
पुढील लेख
'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार