रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (10:45 IST)

Palak Muchhal and Mithun सुप्रसिध्द पलक-मिथुन लग्नबंधनात

गायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन रविवारी मुंबईत विवाहबद्ध झाले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. ‘चाहूं मैं या ना’फेम गायिका पलकने लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनी सांगितले की आज ते कायमचे एक झाले आहेत. लग्नाच्या दिवशी पलकने लाल रंगाचा लेहेंगा तर मिथुनने बेज आणि मरून शेरवानी घातली होती. जवळच्या मित्रांमध्ये लग्नाचे विधी पार पडले. रविवारीच त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूड आणि टीव्हीचे प्रसिद्ध स्टार्स पोहोचले होते.
 
प्री-वेडिंग सेरेमनी घरीच पार पडला
यापूर्वी पलक आणि मिथुनचा प्री-वेडिंग सेरेमनी झाला होता. त्याचे हळदी आणि मेहंदीचे फोटो समोर आले होते. मुंबईत पलकच्या घरी प्री-वेडिंग सोहळा पार पडला. पलकचा भाऊ पलाशने त्याच्या इंस्टाग्रामवर हळदी आणि मेहंदी फंक्शनचे फोटो शेअर केले होते.
 
लग्नाची पहिली पोस्ट
पलकने लग्नानंतरचे फोटो पोस्ट करत लिहिले, 'आज आम्ही दोघे कायमचे एकत्र आहोत. आणि  कायमची नवीन सुरुवात'

Edited by : Smita Joshi