रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (14:16 IST)

Parineeti Raghav Wedding : परिणीतीने लावली हळद, लीला पॅलेसमध्ये लग्नातील पाहुण्यांचे भव्य स्वागत

Parineeti Raghav Wedding :बॉलिवूडची सुंदर दिवा परिणीती चोप्रा तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास सुरू करणार आहे. ती आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांची वधू होणार आहे.  उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये रविवारी हे जोडपे सात फेरे घेतील. प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाली आहेत, वाड्याला सजवले आहे.

सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांचे आगमन सुरूच आहे. राघवचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये संपूर्ण खोली पिवळ्या रंगात सजलेली दिसत आहे. खोली गुरुद्वारा प्रमाणे सजवली आहे 

सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांचे आगमन सुरूच आहे. राघव आणि परिणीतीचा हा हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. लग्नस्थळी लीला पॅलेसमध्ये पंजाबी गाणी वाजवली जात आहेत. 
 
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या जल्लोषात उदयपूर विमानतळही मग्न आहे. विमानतळावर या जोडप्याचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या आतील अनेक ठिकाणे फुलांनी सजवण्यात आली आहेत.  ढोल वाजवून पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. विमानतळाच्या आत एक सेल्फी पॉइंटही बनवण्यात आहॆ. 
 
 
 
Edited by - Priya Dixit