शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (15:17 IST)

आदिपुरुषने पहिल्या वीकेंडला 340 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले

Adipurush
Adipurush Box Office Collection: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत बराच वाद झाला आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये आणि संवादांवर लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. देशातील अनेक राज्यांतून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये 'आदिपुरुष'वर बंदी घालण्यात आली आहे. पण या सगळ्याला न जुमानता आदिपुरुष चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे.
 
'आदिपुरुष' चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात 340 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. आदिपुरुष 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शाहरुख खानच्या पठाणच्या नावावर होता. पठाणने पहिल्या तीन दिवसांत 166.75 कोटींची कमाई केली होती, तर आदिपुरुषने तीन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
 
एकीकडे चित्रपटावर टीका होत असताना दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकही मिळत आहेत. चित्रपटाचा अहवाल येण्यापूर्वीच बहुतेक लोकांनी तिकिटे बुक केली होती. या टीकेचा सोमवारपासून चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होणार हे नक्की.
 
भारतातील अनेक शहरांमध्ये आदिपुरुषाला तीव्र विरोध आहे. मुंबईतील हिंदू संघटनेने चित्रपटाचा शो बंद पाडला. आणि छत्तीसगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी रॅली काढून चित्रपटाचा निषेध केला. याशिवाय अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
 
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि शेषच्या भूमिकेत सनी सिंग आहे.
Edited by : Smita Joshi