पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीकाही झाली होती. निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सिनेक्षेत्रातूनही त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.