गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (08:06 IST)

सरोगसीद्वारे आई बनली प्रियांका चोप्रा, इंस्टाग्रामवर शेअर केली गोड बातमी

Priyanka Chopra becomes mother through surrogacy
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे की त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. प्रियंका चोप्राने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आम्ही बाळाचे स्वागत करत आहोत हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सरोगसीच्या माध्यमातून या बाळाचा जन्म झाला आहे. या नाजूक काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहोत. खूप धन्यवाद.' मात्र, या जोडप्याने अद्याप त्यांना मुलगा आहे की मुलगी हे सांगितलेले नाही.
 
 प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. नुकताच दोघांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते. यानंतर दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.