सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (20:11 IST)

पुनीत सुपरस्टारने उर्फी जावेदला लग्नासाठी मागणी घातली

urfi javed
बिग बॉस चा पुनीत सुपरस्टार ने बिगबॉस मध्ये खूप अतरंगीपणा केल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले. आता त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून खूपच चर्चेत आहे. 

या व्हिडीओ मध्ये त्याने उर्फी जावेदला लग्नाची मागणी घातली आहे. या व्हिडिओत त्याने हात जोडून उर्फीला लग्नासाठी मागणी घालत आहे. या वर उर्फीची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. 

पुनीत सुपरस्टारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो उर्फी जावेदला म्हणतो, 'उर्फी जावेद यार, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खूप दिवसांपासून एक गोष्ट सांगायची होती पण सांगता येत नव्हते. उर्फी मी तुझ्यासारखी मुलगी शोधत होतो. हात जोडून मी तुला माझ्याशी लग्न करण्याची विनंती करतो.'
 
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उर्फी जावेदची प्रतिक्रियाही समोर आली आहे. पापाराझीशी बोलत असताना तिने सांगितले की, तिचे लग्न झालेले नाही पण ती त्याला आय लव्ह यू टू म्हणते. आता दोघांच्या या संवादावर चाहतेही जोरजोरात हसत आहेत. हे सर्व व्हिडिओसाठी केलेला स्टंट वाटत आहे.  
 
Edited by - Priya Dixit