गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (14:27 IST)

Rakhi Sawant अभिनेत्री राखीचे दुसरे लग्न?

rakhi sawant
Instagram
बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटली जाणारी राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबतच्या नात्याबद्दल ती बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती.
 
 हे दोघे अनेकदा मीडियासमोर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता राखी सावंतबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
राखी आणि आदिलचे फोटो व्हायरल झाले  
अभिनेत्री राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांचे कोर्ट मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राखी सावंत पारंपारिक पोशाखात दिसत आहे. राखीने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा शरारा परिधान केलेला दिसत आहे आणि अभिनेत्रीने तिच्या कपाळावर ओढणी घेतली आहे.
 
तर आदिल काळ्या शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. राखी सावंतचे तीन फोटो व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटोमध्ये राखी आणि आदिल गळ्यात हार घालून आणि हातात लग्नाचे प्रमाणपत्र घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये राखी कागदपत्रावर सही करताना दिसत आहे. तिसऱ्या चित्रात राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांचे विवाह प्रमाणपत्र आहे. त्यावर दोघांचे पासपोर्ट आकाराचे फोटो चिकटवले आहेत. पण लग्नाची तारीख 29 मे 2022 लिहिली आहे. यावरून असे दिसून येते की राखीने 2022 मध्येच आदिलसोबत लग्न केले होते.