बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (07:17 IST)

राखी सावंतच्या भावाला मुंबईत अटक,

arrest
राखी सावंत हीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पण यावेळी तिच्यामुळे नाही, तर राखीच्या भावामुळे तिच्या नावाची चर्चा होतेय. राखीचा भाऊ राकेश सावंत याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चेक बाऊंस प्रकरणी राकेश सावंतला अटक करण्यात आलीये. राकेश एक डायरेक्टर, निर्माता आणि लेखक आहे. त्याला ७ मे रोजी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं.
 
२०२० मध्ये एका व्यापाऱ्यानं राकेश सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. पैसे परत करण्याच्या अटीवर न्यायालयानं त्याला चेक बाऊंस प्रकरणी जामीन मंजूर केला होता. परंतु न्यायालयानं आदेश देऊनही त्यानं पैसे परत केले नाहीत. यानंतर न्यायालयानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढलं. रविवारी रात्री राकेशला अटक करण्यात आली आणि सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
यापूर्वीही त्याच्या नावाची चर्चा
 
यापूर्वी आदिलनं राखी सावंतला मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर राकेश सावंतचं नाव चर्चेत आलं होतं. ज्या दिवशी आईचं निधन झालं तेव्हा आदिलनं माझ्या बहिणीला मारहाण केली होती. आम्ही सर्व रागात होतो. आम्ही राखीला कूपर रुग्णालयात जाण्यास सांगितलं. तिकडे तिची वैद्यकीय चाचणी केली गेली.  तिला जनावरांप्रमाणे वागणूक दिल्याचं राकेशनं पापाराझीशी बोलताना म्हटलं होतं.
Edited by : Ratnadeep Ranshoor