रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 जून 2023 (09:46 IST)

Ram Charan-Upasana: राम चरण आणि उपासना एका गोंडस मुलीचे पालक बनले

Ram Charan, Upasana
गेल्या नऊ महिन्यांपासून मेगास्टार चिरंजीवी ज्याची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. 20 जून रोजी राम चरण आणि उपासना यांच्या घरी एका गोंडस मुलीचे जन्म झाले आहे. कुटुंबासह राम चरणचे चाहतेही ही बातमी ऐकून आनंदित झाले आहेत.
 
राम चरण यांची पत्नी उपासना यांनी मंगळवारी 20 जून रोजी हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये एका सुंदर बाळाला जन्म दिला. लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत. वृत्तानुसार, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी, सुरेखा आणि कामिनेनी कुटुंब नवीन सदस्याचे स्वागत करताना आनंदित झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राम चरण आणि उपासना यांनी जाहीर केले होते की ते लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाची वाट बघत आहेत.
 
राम चरण आणि उपासना दोघेही हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जाताना दिसले. उपासनाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अखेर तिने पहिल्या बाळाला  जन्म दिला. ही बातमी ऐकून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.चिमुकलीच्या आगमनाची बातमी समजताच राम चरण आणि उपासनाचे चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. कुटुंबियांसह अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
 
 




Edited by - Priya Dixit