सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (09:17 IST)

Ram Setu Movie Trailer:अक्षय कुमारच्या राम सेतूचा ट्रेलर रिलीज

अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा स्टारर चित्रपट राम सेतूचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला .अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची थोडी निराशा झाली होती. राम सेतूचा ट्रेलर रिलीज झाल्यावर युजर्स प्रतिक्रिया देत आहे. 
राम सेतू चित्रपटाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञाची आहे ज्याला राम सेतू खरा आहे की केवळ काल्पनिक आहे याचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.रामायणातील कथेनुसार, भारत आणि श्रीलंका दरम्यान भगवान श्रीरामाच्या सैन्याने राम सेतू बांधला होता. राम सेतूचे सत्य शोधण्यासोबतच चित्रपटाची कथा इतिहासाची आणखी अनेक पाने उलटते. चित्रपटाची कथा निव्वळ काल्पनिक आहे पण ती भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये अजूनही अस्तित्वात असलेल्या राम सेतूच्या रचनेभोवती फिरते.
 
अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन, थ्रिलर आणि थ्रिलने परिपूर्ण आहे.चित्रपटाची कथा राम सेतू वाचवण्याच्या मिशनची आहे.झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.चित्रपटाचा 2 मिनिट 9 सेकंदाचा ट्रेलर सुरुवातीला थोडी उत्सुकता वाढवतो पण नंतर पार्श्वसंगीतापासून ते अॅक्शन सीन आणि अॅनिमेशनपर्यंत सर्व काही निराशाजनक होते.चित्रपटाचे कथानक नि:संशय भक्कम आहे आणि शेवटी अक्षय कुमार हातात दगड उचलून वानर सेनेच्या शैलीत राम सेतूवर चालत असल्याचे दृश्यही खूप आकर्षक आहे. 
 
राम सेतू चित्रपटाच्या ट्रेलरवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.काही लोकांना ते निराशाजनक वाटले आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर अनेकांना चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक वाटला.सैफ अली खान आणि प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटाच्या ट्रेलरला ट्रोल केले गेले नसले तरी लोकांचा प्रतिसादही पूर्णपणे सकारात्मक नाही.या चित्रपटावर मीम्स बनवण्यास सुरुवात झाली आहे
 
 
Edited By - Priya Dixit