शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणबीरचा परफेक्ट संजय दत्त लूक

अभिनेता रणबीर कपूर खलनायक स्टार संजूबाबाची भूमिका आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये करणार असून हा चित्रपट मुन्नाभाई सीरीज, 3 इडियट्स, पीके फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी दिग्दर्शित करीत आहेत. रणबीर कपूरने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली असून संजय दत्तसारखे दिसण्यासाठी त्याचा संपूर्ण मेकओव्हर करण्यात आल्याची चर्चा होती. नुकतेच त्याचे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले असून ते पाहून रणबीर कपूर या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचे दिसत आहे.
 
रणबीरला पाहून 1990 मधील संजय दत्तची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एकदम परफेक्ट लूकमध्ये रणबीर कपूर दिसत आहे. मध्यंतरी संजय आणि रणबीरमध्ये काही अलबेल नसून संजय नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण या फोटोवरून तरी सध्या ही फक्त चर्चाच होती असे वाटत आहे.
 
रणबीरने 1990 मध्ये दिसणार्‍या लांब केसांचा संजय दत्त, सोबत ट्राऊजर, शर्ट आणि वेस्टकोटची असलेली फॅशन एकदम तंतोतंत केली आहे. संजयवर आधारित चित्रपट असला तरी चित्रपटात वाद दाखवणे टाळण्यात आले आहेत. वडील मुलाच्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. चित्रपटात परेश रावल सुनील दत्त यांची भूमिका निभावताना दिसतील. तर मनीषा कोईराला नर्गिस दत्त यांची भूमिका साकारणार आहे.