रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (12:58 IST)

'पद्मावती'च्या सेटवर रणवीरचे आहे हे SPECIAL नाव

बॉलीवूड फिल्म मेकर संजय लीला भंसालीचे चित्रपट 'पद्मावती'ची शूटिंग फायनली सुरू झाली आहे. चित्रपटाबद्दल रोज चर्चा होत असते पण तुम्हाला माहीत आहे का, शूटिंगदरम्यान रणवीरला एका स्पेशल नावाने बोलवण्यात येत.  
 
वृत्तानुसार रणवीरला 'पद्मावती'च्या सेटवर सर्व 'खिलजी' नावाने बोलवतात. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात रणवीर, अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर जेव्हा एखाद्या भूमिकेला साकारतो तेव्हा तो त्याबद्दल एकदम सीरियस होऊन जातो आणि रिअल लाईफमध्ये देखील तो आपल्या भूमिकेसारखा दिसू लागतो. यामुळे सेटवर सर्वजण त्याला 'खिलजी' बोलू लागले.  
 
सांगायचे म्हणजे रणवीर आणि दीपिकाने चित्रपटाची शूटिंग एका महिन्या अगोदर पूर्ण केली आहे आणि आता शाहिद देखील त्यात जुळला आहे. रणवीरच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो 'पद्मावती'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि लवकरच त्याचे चित्रपट 'बेफिक्रे' रिलीज होणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर लीड रोलमध्ये दिसणार आहे.