गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (11:25 IST)

अखेर जॅक अँड जॉनसाठी रणवीरने माफी मागितली

[जॅक अँड जॉनच्या जाहिरातीबाबत अखेर अभिनेता रणवीर सिंहने  माफी मागितली आहे. देशातील सध्या प्रमुख शहरांमध्ये रजॅक अँड जॉनच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज झळकले. यात डोन्ट होल्ड बॅक, टेक युअर होम अट वर्क’ अशी टॅग लाईन असलेलली ही जाहिरात आहे. त्यात रणवीर एका मिनी स्कर्ट घातलेल्या मॉडेलला घरी घेऊन जाताना दाखवण्यात आला आहे. नेमक्या याच संकल्पनेवर देशभरातून आक्षेप घेण्यात आल्यानंतर कंपनीला जाहिरात मागे घ्यावी लागली. तर कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण रणवीरने दिलं आहे.