लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच सर्वसामान्यांची “लालपरी” आता नव्या स्वरूपात ब्रँडिंग करत आहे. यासाठी लोकप्रिय दाम्पत्य अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखयांची अधिकृत ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची पुढील ५ वर्षांसाठी एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे, प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करणे आणि रस्ते सुरक्षा तसेच सामाजिक विषयांवर जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.????️ २२ एप्रिल २०२६ ???? मंत्रालय
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) April 22, 2026
एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी रितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते… pic.twitter.com/l6Y5CdKvRA
तसेच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या नियुक्तीनंतर रितेश देशमुखने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांनीही परिवहन खाते सांभाळले होते, त्यामुळे हे नाते अधिक जवळचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिवंगत विक्रम गोखले आणि मकरंद अनासपुरे यांनी एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम पाहिले आहे.
ही जोडी सध्या त्यांच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे, तसेच एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तरुणाई आणि शहरी प्रवाशांमध्ये 'लालपरी'बद्दलची ओढ वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik
