बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘रोबो 2.0’ चा प्रदर्शना आधीच शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘रोबो 2.0’ येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्या सहा महिने अगोदरच चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. साडेतीनशे कोटींचं बजेट असलेल्या ‘रोबो 2.0’चे हक्क ‘झी’ने 110 कोटींना खरेदी केले आहेत.शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो 2.0 चा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट हक्क झी टेलिव्हिजनने 110 कोटींना विकत घेतले आहेत. लायका प्रॉडक्शन्सचे क्रिएटिव्ह हेड राजू महालिंगम यांनी ही माहिती दिली आहे.

अॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससोबत डिजीटल राईट्ससाठी चर्चा सुरु आहे. साधारणपणे सॅटेलाईट हक्क कायमस्वरुपी विकले जातात. मात्र इतकी मोठी रक्कम मोजून केवळ 15 वर्षांसाठीच सिनेमाचे हक्क विकण्यात आले आहेत. सिनेमाचे थिएटरिकल हक्क अद्याप विकलेले नाहीत. फक्त हिंदी भाषेतील हक्कच शंभर कोटींना विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय चिनी आणि जपानी भाषेतील हक्क वेगळे विकले जाणार आहेत. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम अंतिम टप्प्यात आहे. काही सीन्सचा अपवाद वगळता बहुतांश शूटिंग गेल्या वर्षी पार पडलं.