रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानविरूद्ध खटल्याची अंतिम सुनावणी मार्चपासून

जोधपूर- बॉलीवूड स्टार सलमान खान विरूद्धच्या काळवीट शिकार प्रकरणाची अंतिम सुनावणी एक मार्चपासून सुरू होईल, असे त्याच्या वकिलाने सांगितले आहे. गेल्या 27 तारखेच्या सुनावणीमध्ये सलमान खानने तो निर्दोष असल्याचे सांगितले होते. शिवाय आपण आ‍णखी पुरावेही सादर करू अशी माहिती त्याने न्यायालयासमोर दिली आहे.
 
सुरक्षेच्या कारणामुळे आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे शिकारीला जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्याचे म्हणणे होते.