सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (11:33 IST)

सलमान खानच्या अडचणी वाढल्या, आता 'या' प्रकरणी न्यायालयाने समन बजावले

अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले होते. मात्र आता या अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
 
सलमान खानविरोधात समन्स जारी
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा फटका बसला आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेता सलमान खानला 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार अशोक पांडे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने सलमान खानला पुढील महिन्यात 5एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
 
 अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान विरोधात दाखल झालेल्या आरोपात अभिनेत्यावर गैरवर्तन आणि मारहाण केल्या प्रकरणी समन्स जारी केले असून 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण 2019 च्या पत्रकार अशोक पांडेशी संबंधित आहे, जेव्हा त्यांनी अभिनेत्यावर गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. एका टीव्ही पत्रकाराने सायकल चालवत असताना राधे अभिनेत्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.