रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान खान लाँच करणार ई-सायकल

फिटनेस फ्रिक सलमान खान अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसून जातो. आता तो बीइंग ह्युमनद्वारे ई-सायकल लाँच करणार आहे. ज्याने प्रदूषण होणार नाही आणि यापासून होणारी आय गरजू लोकांना पुरवली जाईल.
ई-सायकल काढण्याची कल्पना सलमानची असून लवकरच देशातील प्रमुख स्टोअर्सवर ही उपलब्ध असणार. याची किंमत कमी ठेवण्यात येईल. याला स्लिम, कूल आणि न्यू एज स्टाइल बाइक असे नाव दिले जात आहे कारण ही सायकल बॅटरीने चालणार.
 
ही सायकल पाच मॉडल्समध्ये उपलब्ध असून सर्व वयाचे आणि लोकं ही चालवू शकतात. सलमानप्रमाणे ही सायकल बाइकचा विकल्प असणार आणि विद्यार्थी याचा अधिक उपयोग करू शकतील.