शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

संजयने सलमानला म्हटले गर्विष्ठ

संजयने सलमानला म्हटले गर्विष्ठ
संजय दत्त नेहमी बिंदास राहतो आणि हल्ली तर तो फ्रंट फुटावर खेळत आहे. जे तोंडात येतं ते बोलत सुटतो. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरवर राग काढून चुकले संजय दत्त ने सलमान खानला गर्विष्ठ म्हटले. एका कार्यक्रमात प्रश्नांचे उत्तर देताना जेव्हा संजयला विचारले गेले की सलमान खानचे एका शब्दात वर्णन करा. तर संजय म्हणाला गर्विष्ठ. संजयच्या तोंडून हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. काही महिन्यांपूर्वी तर हे दोघे चांगले मित्र होते पण आता ती गोष्ट राहिलेली नाही.
का संबंध खराब झाले या दोघांचे...
सलमान आणि संजय चांगले मित्र होते. संजय जेलमध्ये असताना सलमान त्याची वाट बघत होता आणि संजयसाठी सल्लूने आपल्या फॉर्म हाउसवर पार्टीही आयोजित केली होती. परंतू संजय बाहेर पडल्यावर सलमान त्याला भेटायला गेला नाही. सलमानची इच्छा होती की संजयच्या पुढल्या करिअरची प्लानिंग रेशमा शेट्टीने करावी. पण रेशनमाने निर्मात्यांकडे इतकी मोठी रक्कम मागितली की कोणही संजयला साइन करायला तयार झाले नाही. रेशमाच्या या वागणूकीमुळे संजय परेशान झाला आणि त्याने तिचा सल्ला नाकारला. परिणामस्वरूप सलमानही नाराज झाला आणि दोघांचे संबंध बिघडले. आता संजयने सलमानला गर्विष्ठ म्हणून या गोष्टीला पुरावा दिला आहे.