1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Shah Rukh Khan Kids choice award

बच्चे कंपनीचा आवडता हिरो शाहरूख

यंदाचा किडस चॉईस अॅवॉर्ड २०१६ साठी किड्स आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार बॉलीवूडचा शहेनशहा शाहरूख खान याने पटकावला आहे. 
निकेलॉडियन तर्फे आयोजित करण्यात आलेला या संदर्भातला कार्यक्रम अतिशय मनोरंजक ठरला. या कार्यक्रमाला अनेक चित्रपट तारे तारका उपस्थित होत्या. या पुरस्कारानंतर बोलताना शाहरूख म्हणाला, मला असे सांगितले गेले होते की कलाकार म्हणून लहान मुलांची मने जिंकता आली तरच तो खरा मनोरंजन करणारा कलाकार मानला जातो. मी हा पुरस्कार जिंकला म्हणजे मी खरोखरच मनोरंजन करणार कलाकार आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मी खूष आहेच पण माझ्यासाठी हा पुरस्कारही खास आहे. त्यामुळेच आज शूटिंग असतानाही मी या कार्यक्रमाला आलो आहे. कारण बच्चेकंपनीने माझी निवड केली आहे.
 
दीपिका पदुकोण हिला बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सलमानखानला सुल्तान साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सुल्तान सर्वोत्तम चित्रपट, टायगर श्रॉफ सर्वोत्तम डान्सर, काला चष्मा सर्वोत्कृष्ट गीत तर कार्टून शो मोटू पतलू मधील मोटू हे सर्वोत्कृष्ट कार्टून कॅरेक्टर अशी अन्य श्रेणीत निवड केली गेली.
पुढील लेख
दीपिका ने पछाडले प्रियंकाला ... मिळाला सेक्सिएस्ट एशियन वूमॅनचा किताब