मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (13:43 IST)

शाहरुखच्या मुलाला आज जामीन मिळणार?

क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान अटकेत आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे. आज आर्यन खानला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर पावणे तीन वाजता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती.