शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (13:34 IST)

राज कुंद्राच्या सासू सुनंदा शेट्टीची पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार

शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आहेत. आता शिल्पा शेट्टीच्या आईने पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. प्रकरणात तपशीलवार जाणून घ्या- 
 
या प्रकरणाचा राज कुंद्रा किंवा शिल्पाशी काही संबंध नाही. शिल्पाची आई सुनंदा यांनी जमीनीच्या फसवणूकीबद्दल तक्रार दिली आहे. सुनंदा शेट्टी यांनी सुधाकर घारे विरोधात जहू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही तक्रार कर्जत जिल्हा रायगड संबंधित आहे.
 
सुनंदा यांनी पोलिसांना सांगितले आहे की त्यांनी सुधाकर यांच्याशी कर्जत येथून 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान जमीन करार केला होता. त्यावेळी त्यांनी ही जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगून बनावट कागदपत्रांच्या मदतीने सुनंदाला 1 कोटी 60 लाखांना विकली होती.
 
थोड्या दिवसांनी जेव्हा सुनंदा यांना फसवणुकीबद्दल कळले तेव्हा त्यांनी सुधाकर यांना याबद्दल विचारले. सुधाकर म्हणाले की ते एका नेत्याच्या जवळचे आहेत. तसेच कोर्टात जाण्यास सांगितले. यानंतर सुनंदा कोर्टात गेल्या आणि कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.