Dharma Sangrah
✕

Siddharth: 'चिक्कू' चित्रपटाच्या कार्यक्रमात गोंधळ, अभिनेता सिद्धार्थ कार्यक्रमातून बाहेर

Updated: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (07:17 IST)
 
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, सदस्यांनी सिद्धार्थला सांगितले की त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची ही योग्य वेळ नाही, कारण कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटकचा तामिळनाडूशी संघर्ष सुरू आहे. या विरोधानंतर सिद्धार्थ मीडियाला संबोधित न करता पत्रकार परिषद सोडून निघून गेला. 
 
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये कथित कन्नड समर्थक गटाचे सदस्य या कार्यक्रमाला विरोध करताना दिसत आहेत. मात्र, सिद्धार्थ सुरुवातीला शांत बसून राहिला, नंतर तो उभा राहिला, हात जोडून सर्वांचे आभार मानून बाहेर निघून गेला. कावेरी जल नियामक समितीने (CWRC) कर्नाटक सरकारला 18 दिवसांसाठी कावेरीचे 3,000 क्युसेक (घनफूट प्रति सेकंद) पाणी तामिळनाडूला सोडण्याची शिफारस केल्यानंतर काही दिवसांनी हा विरोध झाला आहे. सत्ताधारी काँग्रेसने आता या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सिद्धार्थच्या चिक्कू या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन एसयू अरुण कुमार यांनी केले आहे. हे एक फॅमिली ड्रामा आहे. हा चित्रपट एका व्यक्तीबद्दल आहे जो आपल्या हरवलेल्या भाचीला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिकेत तर आहेच पण त्याची निर्मितीही करत आहे. चिक्कू 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
 




Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments