संबंधित माहिती
- Sunidhi Chauhan: संधी मिळाल्यास सुनिधी चौहान अभिनयही करेल
- Jailer: चाहत्यांना रजनीकांतचा जेलर चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी जाहीर
- Spandana Ragavendra Dies अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचे निधन
- नितीन देसाईंना कर्ज देणारी ‘एडलवाईज एआरसी’ कंपनी नेमकी काय आहे?
- Malvika Raaj Engagement: कभी खुशी कभी गम'च्या अभिनेत्रीचा साखरपुडा
Siddiqui passed away :बॉडीगार्ड'चे दिग्दर्शक सिद्दीक यांचे निधन
social media
सिद्दीक यांना त्यांच्या आजारपणानंतर एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) मशीनच्या आधारावर ठेवण्यात आले होते. 8 ऑगस्ट रोजी एक वैद्यकीय मंडळ सिद्दीकच्या प्रकृतीचे मूल्यांकन करून पुढील कारवाई ठरवणार होते. लोकप्रिय मल्याळम अभिनेता दुल्कर सलमानने सोशल मीडियावर दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने दक्षिणेसह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि निर्माते अतुल अग्निहोत्री यांनीही सिद्दीकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सिद्दीकीने 1989 मध्ये 'रामजी राव स्पीकिंग' या मल्याळम चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 1986 मध्ये 'पप्पन प्रियापेट्टा पप्पन' या मल्याळम चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथा लेखक म्हणून पदार्पण केले. मोठ्या पडद्यावर आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट 'बिग ब्रदर' होता.
त्यांनी सलमान खानचा बॉडीगार्ड हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 2011 साली आला होता. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
दिग्दर्शनासोबतच सिद्दीकीने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 2022 मध्ये तो 'केनकेमम' या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसले होते.
Edited by - Priya Dixit
