शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (13:40 IST)

singer Zakir Hussain passed away : स्टार व्हॉईस ऑफ इंडिया फेम गायक मोहम्मद जाकीर हुसैन यांचे निधन

Shradhanjali RIP
अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया फेम, कोरबा येथील प्रसिद्ध गायक मोहम्मद जाकीर हुसेन यांचे मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहम्मद जाकीर हुसेन हे कुटुंबासह बिलासपूर येथे गेले होते. येथे अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 
 
आपल्या आवाजाने संपूर्ण देशात कोरबाला वैभव प्राप्त करून देणारा मोहम्मद जाकीर हुसेन यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे.जाकीरच्या पश्चात त्यांचे  वडील, पत्नी आणि मुलांसह संपूर्ण परिवार आहे. त्यांचा मृतदेह बिलासपूरहून कोरबा येथे आणण्यात येत आहे. बुधवारी अखेरचा निरोप घेऊन त्यांचे पार्थिव सुपूर्द ए खाक  केले जाईल. गायक मोहम्मद जाकीर हुसेन हे लहानपणापासून संगीताच्या क्षेत्रात होते. त्यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit