गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2016 (09:54 IST)

'रईस' साठी शाहरुखने घेतली राज यांची भेट

'रईस' साठी शाहरुखने घेतली राज ठाकरे यांची भेट
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान असल्यामुळे  'रईस' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. याबाबत बोलण्यासाठी  चित्रपटाचा अभिनेता आणि निर्मिता असलेला शाहरुख खान  याने मनसेसोबत चर्चा करण्यासाठी  स्वतः पुढे आला.

शाहरूखने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी माहिरा खान येणार नसून या सर्व अफवा असल्याची माहिती देण्यासाठी शाहरूख खान आपल्याला भेटला अशी माहिती बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे. येत्या  25 जानेवारी 2017 रोजी ‘रईस’प्रदर्शित होत आहे.