Sruthi Shanmuga Priya: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती षणमुगा प्रियाच्या पतीचे निधन
Instagram
अरविंद शेखर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तमिळ चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. येथे अभिनेत्री श्रुती षणमुगा प्रियाने पतीच्या निधनानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
यासोबत तिने भावनिक कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'फक्त शरीर वेगळे झाले आहे. पण तुमचा आत्मा आणि विचार नेहमी माझ्यासोबत राहतील आणि नेहमी माझे रक्षण करतील. शांत राहा, माझे प्रिय अरविंद शेखर... माझे तुझ्यावरील प्रेम अजूनच वाढले आहे. आम्ही आधीच एकमेकांच्या खूप आठवणी गोळा केल्या आहेत, ज्याला मी आयुष्यभर सोबत घेऊन जाईन. तुझी खूप आठवण येते आणि तुझ्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रेम करते अरविंद. मला तू नेहमी माझ्या जवळ वाटतो.
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये दि तिने सर्वांना आपल्या पतीबद्दल चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन केले आहे. श्रुतीने लिहिले आहे की,वृत्तवाहिन्या आणि माध्यमांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे थांबवावे. यामुळे आम्हाला त्रास होतो. आम्ही अत्यंत दुःखद परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.
Edited by - Priya Dixit

