Dharma Sangrah
✕

लाईव्ह शोमध्ये गायक पवन सिंगवर दगडफेक

Updated: मंगळवार, 7 मार्च 2023 (17:35 IST)
 
हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लोकांनी मंचावर दगडफेक केली.
पवन सिंग आणि गायिका शिल्पी राज एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करत होते, त्यासाठी परवानगी घेण्यात आली होती.
 
पवन आणि शिल्पीला ऐकण्यासाठी मोठा जमाव जमला होता आणि कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा हल्ला झाला.
 
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पवन सिंह यांच्यावर हा हल्ला झाला, यूपीच्या बलिया जिल्ह्यातील, हा हल्ला एका कार्यक्रमादरम्यान झाला, कार्यक्रमादरम्यान सादरीकरण देत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.सादरीकरण करत असलेल्या पवन सिंगच्या चेहऱ्यावर मोठा दगड लागला. सुदैवाने पवन सिंगला गंभीर दुखापत झाली नाही . मिळालेल्या माहितीनुसार, जमावात उपस्थित असलेल्या काही व्यक्तीने त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर पवन सिंह मंचावरून खाली आले आणि प्रकरण शांत झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
 
कार्यक्रमात खूप जल्लोष झाला होता, सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत होते, त्याच दरम्यान रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जमावातील कोणीतरी पवन सिंह यांच्यावर दगडाने हल्ला केला, जो थेट पवनसिंग यांच्यावर आदळला. त्यामुळे पवनसिंगला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र काही काळ स्टेजवर गोंधळ माजला होता, पवन सिंह यांना तत्काळ मंचावरून खाली आणण्यात आले, त्यानंतर कार्यक्रम बराच वेळ बंद ठेवण्यात आला. त्यानंतर पवन सिंह यांनी कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम सुरू केला, हल्ल्यानंतर पवन सिंह म्हणाले की, हिम्मत असेल तर समोरून हल्ला करा, मागून हल्ला करणारे भ्याड आहेत.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

विमल जाहिरात वादासंदर्भात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; तुकाराम मुंडे म्हणाले....

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

'इठा'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला, श्रद्धा कपूर लावणी कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments