गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified सोमवार, 19 एप्रिल 2021 (12:17 IST)

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सुहाना खानचे ग्लॅमरस स्टाईल, फ्रेंडसोबत फोटो शेअर केले

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याची मुलगी सुहाना खानची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत स्टार किड्समध्ये केली जाते. तिनी चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली नाही पण सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग एखाद्या सुपर स्टारपेक्षा कमी नाही. त्याचबरोबर सुहानासुद्धा तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी आपले फोटोशेअर करताना दिसते. नुकत्याच अशाच काही कारणांमुळे सुहानाने पुन्हा एकदा इंटरनेटवर धडक दिली आहे. ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये तिने ग्लॅमर्स स्टाइल दाखविली. 
 
वास्तविक, सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम एकाउंटवर मैत्रिणीसोबत फोटो शेअर केलीआहेत. या फोटोंमध्ये सुहाना खान ब्लॅक ड्रेस आणि ब्लॅक जॅकेट परिधान करताना दिसतआहे. या मैत्रिणीसोबत फोटो शेअर करताना सुहानाने म्हटले आहे की ती आपल्या मैत्रिणीला मिस करत आहे. सुहाना ब्लॅक आऊटफिटमध्ये ग्लॅमरस दिसत असतानाच तिची मैत्रिण रेड टॉप आणि ब्लु जीन्समध्येही काही कमी दिसत नाही.