1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. sunil grover in the comedy family

सुनील ग्रोवर ‘द कॉमेडी फॅमिली’तून दिसणार

सुनील ग्रोवर
कपिलच्या शोमधून निघाल्यानंतर सुनील ग्रोवर ‘द कॉमेडी फॅमिली’ या कार्यक्रमातून विनोदी खेळी करताना दिसणार आहे. सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर, संकेत भोसले हे ओळखीचे विनोदी चेहरे पुन्हा एकदा त्यांच्या धमाल विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी सज्ज झालेत.

कपिल शर्माच्या टीममधील बरेच चेहरे यात सुनीलची साथ देणार आहेत.  हा एक लाइव्ह कार्यक्रम असेल. या कार्यक्रमातूनच अहमदाबादमध्ये मे महिन्याच्या २७ तारखेला ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि त्यांचं अतरंगी कुटुंब विनोदी फटकेबाजी करणार आहे.
 
पुढील लेख
'थ्री इडियट्स' चा मेक्सिकन भाषेत रिमेक