1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:16 IST)

सूर्यवंशीने केली भरघोस कमाई, 250 कोटींने गल्ला भरला

Suryavanshi made a lot of money
अक्षय आणि कतरिनाचा चित्रपट सूर्यवंशी बंपर कमाई करत आहे. रिलीजच्या दुस-या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे . ब्लॉकबस्टर ठरत असलेला सूर्यवंशी हा चित्रपट  250 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात अक्षय आणि कतरिना व्यतिरिक्त रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील खास भूमिकेत आहेत. बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे . कोविडनंतर या चित्रपटाने थिएटरमध्ये पुन्हा प्रेक्षकांना ओढले  आहे. अक्षय आणि कतरिनाच्या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. ब्लॉकबस्टर ठरत असलेला सूर्यवंशी हा चित्रपट  250 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
समीक्षक आणि चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 250 कोटी रुपये कमावले आहेत. येत्या काही दिवसात हा चित्रपट एक नवा विक्रम करू शकतो.