1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (16:19 IST)

Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नूविरुद्ध इंदूरमध्ये तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका फॅशन शोदरम्यान हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अभिनेत्री तापसी पन्नूविरुद्ध एका संघटनेने मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
इंदूर पोलिसांनी तापसी पन्नूविरोधात तक्रार नोंदवली असून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. छत्रीपुरा पोलीस ठाण्याचे एसएचओ कपिल शर्मा यांनी सोमवारी ही माहिती दिली.
 
छत्रीपुरा पोलिस स्टेशनचे एसएचओ कपिल शर्मा यांनी सांगितले की, "एकलव्य गौरकडून एक अर्ज आला आहे की, अभिनेत्री तापसी पन्नूने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना लक्ष्मी जीचे लॉकेट घातले होते आणि त्यादरम्यान तिने रिव्हिलिंग ड्रेस घातला होता. अर्जदाराने असे म्हटले आहे की त्या लॉकेटच्या वेशभूषेमुळे त्यांच्या धार्मिक भावना आणि सनातन धर्माची प्रतिमा दुखावली गेली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
 
Edited By- Priya Dixit