शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:42 IST)

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा'चे अनावरण!

Tadap's first song 'Tumse Bhi Zyada' unveiled!
अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात तारा सुतारियासोबत   दिसणार आहे आणि चित्रपटाच्या रॉ आणि इंटेन्स ट्रेलरने प्रत्येकाला कथेशी जोडले आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे ज्याला रसिकांची खूप पसंती मिळत आहे.
 
'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' आज धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली असून क्लिपमध्ये तो आणि तारा चुंबन घेताना आणि रोमांचक क्षण एकत्र घालवताना दिसतात मात्र, पुढच्याच क्षणी कोणीतरी त्यांना ओढून एकमेकांपासून दूर करतात. त्याची बाईक देखील पेटवली जाते. एकूणच या गाण्याने चाहत्यांना चित्रपटांविषयी अतिशय उत्सुक केले आहे.
 
साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित, नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.