गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

तमन्ना भाटियाचा "लस्ट स्टोरीज २" मध्ये दमदार परफॉर्मन्स !

सगळे प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते अशी " लस्ट स्टोरीज 2 " या बहुप्रतिक्षित वेब सीरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर ही दमदार सीरिज आली असून प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिल्याचं समजतंय. सध्या ज्या अभिनेत्रीच्या सर्वत्र चर्चा आहे अशी तमन्ना भाटिया या सीरिज मध्ये मुख्य भूमिकेत आहे तिच्या आकर्षक भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. याआधी कधीही न साकारलेल्या अश्या अनोख्या भूमिकेने तमन्नाने पुन्हा एकदा एक कलाकार म्हणून तिची चमक दाखवली आहे. 
 
लस्ट स्टोरीज 2 मधील तमन्ना भाटियाच्या अफलातून अपवादात्मक कामगिरीचे सर्वदूर कौतुक होत आहे. चाहते आणि समीक्षक दोघांनी तिच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. ती प्रत्येक भूमिका अगदी लीलया पार पाडते प्रत्येक हावभाव आणि संवाद  अस्सल पद्धतीने करते आणि यामुळे ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अभिनयाच्या क्षेत्रात तमन्ना पुन्हा चमकली आहे. 
 
तमन्ना लवकरच मल्याळम चित्रपट " बांद्रा " मध्ये दिसणार असून तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये जेलर असे बहुभाषिक चित्रपटात तमन्ना आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.