suvichar

‘हीरामंडी ’चा टीझर प्रदर्शित

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (09:50 IST)
 
‘हीरामंडी ’चा टीझर आता प्रदर्शित झाला असून त्याला नेटक-यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी त्याचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यावेळी त्यातील अभिनेत्री आणि त्यांचा लूक पाहून चाहते भारावून गेले होते. खासकरून मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा यांच्या लूकवर चाहते फिदा झाले होते.
 
प्रेम, सत्ता आणि स्वातंत्र्य यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणून ‘हीरामंडी’कडे पाहिले जात आहे. भन्साळी यांचे चित्रपट, त्यांची कथा, त्यांचे सादरीकरण, त्यांचे निर्मिती मूल्य, छायादिग्दर्शन आणि सेट, त्याची भव्यता हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यामुळे भन्साळी यांचे चित्रपट थिएटरमध्ये पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो. आता आगामी काळात त्यांच्या ‘हीरामंडी’ नावाच्या चित्रपटाचे वेध लागले आहेत.
 
‘हीरामंडी’ ही एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी सीरिज असल्याचे बोलले जात आहे. त्याची चाहते ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘हीरामंडी द डायमंड बाजार’ मधून भन्साळी हे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या टीझरमध्ये आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा या अभिनेत्री दिसत आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

गायक निसार वायनाड यांचे दुबईत वयाच्या ४४ व्या वर्षी निधन

अक्षय-सैफच्या 'हैवान'मध्ये खरा शिकारी कोण आहे? कथा, कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

Asha Bhosle's Birthday आशा भोसले यांच्या आवाजातील ही १० गाणी आजही रसिकांच्या मनात का आहेत?

वरुण धवन आईसोबत 'हनुमान अंश' पाहण्यासाठी गेला, अभिनेता म्हणाल-"हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक दिव्य अनुभव आहे"

मुंबईतील हे ठिकाण न्यूयॉर्कलाही टक्कर देते; समुद्राच्या लाटा आणि 'क्वीन्स नेकलेस'ची चमक तुमचे मन मोहून टाकेल

पुढील लेख
Show comments